! लग्नानंतर रश्मिका-विजयचा मोठा निर्णय, तेलंगणातील ४४ सरकारी शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप जाहीर
Rashmika and Vijay Announce Scholarship:अभिनेत्री रश्मिका देवरकोंडा आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू असतानाच, या कपलवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
: साऊथ सिनेइंडस्ट्रीतले स्टार कपल विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना नुकतेच विवाहबंधनात अडकले . या दोघांच्या लग्नाची चर्चा संपूर्ण देशभरात असतानाच, विजय आणि रश्मिका यांनी घेतलेल्या एका निर्णयाचं कौतुक होताना दिसतंय
.खरं तर कलाकारांच्या आयुष्यात त्यांच्या चाहत्यांचाही मोठा वाटा असतो. रश्मिका आणि विजय यांनी त्यांचा हा आनंद चाहत्यांसोबत वाटला. देशात वेगवेगळ्या ठिकाणी मिठाईचं वाटप करण्यात आलं, वेगवेगळ्या मंदिरांत अन्नदानही त्यांनी केलं. तर आता त्यांनी आपल्या गावी घेतलेल्या एका निर्णयानं चाहत्यांची मने जिंकली आहेत. आपल्या लग्नाचा आनंद साजरा करताना विजयनं सामाजिक भान जपत तेलंगणातील ४४ सरकारी शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप (शिष्यवृत्ती) देण्याची घोषणा केली आहे
गावातील घरातील पूजेनंतर केली घोषणा
२६ फेब्रुवारी २०२६ रोजी उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा उरकल्यानंतर हे नवविवाहित जोडपं विजयच्या मूळ गावी, थुम्मनपेटा इथं पोहोचलं. तिथं त्यांनी ‘सत्यनारायण पूजा’ आणि ‘गृहप्रवेश’ विधी पार पाडले. यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना विजयनं आपल्या ‘देवरकोंडा चॅरिटेबल ट्रस्ट’ च्या वतीनं ही मोठी घोषणा केली.